Thursday, 27 July 2017

|| माँसाहेब जिजाऊंचे माहेर- सिंदखेडराजा ||


महाराष्ट्र म्हणून ज्या भूप्रदेशाला प्राचीन काळी संबोधल जायच, त्या विदर्भाच्या काळ्या कसदार भूमीमधे अनेक नर-नारी रत्नांची निर्मिती झाली...

शिवरायांची जन्मदात्री जिजामाताही याच भूमीत जन्मल्या.. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड नावाचे गाव हीच जिजाऊंची जन्मभूमी..
त्यांचा जन्म ज्या जाधव घराण्यात झाला...
त्या घराण्याने आपल्या पराक्रमाने राजवैभव मिळविले व खर्या अर्थाने ते रयतेचे राजे झाले, म्हणून या गावाला सिंदखेडराजा हे नाव पडले...

आज तालुक्याचे गाव असलेले सिंदखेडराजा प्राचीन काळी आलापूर या नावाने ओळखले जात असे...
सिंधुरम नावाच्या राजाने हे खेडे वसविले म्हणून त्याचे नाव सिंदखेड पडले असे म्हणतात...
सिंदखेडकर राजे जाधवरावांच्या बखरीमध्ये बखरकार म्हणतो की....,
'कदीम वस्ती आलापूर नंतर सिंदुराजा गौळी याने अलिकडे सिंदखेड वस्ती केली....'
परंतु बखरकारांच्या या उल्लेखाशिवाय सिंदुराजाचा कोणताही पुरावा आढळत नाही...
उपलब्ध पुराव्यावरून सिंदखेडचे मूळ नाव सिद्धपूर किंवा सिद्धक्षेत्र हे असावे...
सिंदखेड येथील जुन्या कागदपत्रांमधे सिध्दक्षेत्र, सिद्धपूर असा उल्लेख आढळतो येथील निळकंठेश्वराच्या मंदिरा मध्ये शके १५०९ मधील शिलालेख कोरलेला आहे..
त्यात 'परगणे शीधपूर' असा स्पष्ट उल्लेख आहे.. त्याचप्रमाणे सिंदखेडचे प्रसिध्द संतकवी गोसावीनंदन यांच्या चरीत्रामधे...,
"सिंदखेड स्थळ | सिध्दांचे केवळ | देखोनी तात्काळ | वास केला ||" असे या गावाचे वर्णन आहे... यावरुन या परिसरात अनेक सिध्द, योगी होऊन गेलेत म्हणुन 'सिध्दपूर' हे या गावाचे मूळ नाव असून त्याला कालांतराने 'सिध्दक्षेत्र' म्हटले गेले असावे व त्याच्र रुपांतर 'सिंदखेड' असे झाले असावे हे स्पष्ट होते...
बुलढाना गॅझेटीयरमध्ये सिंदीच्या झाडावरुन हे नाव या गावाला पडले असावे असा उल्लेख आहे...
'वर्हाडाचा इतिहास' लिहिणारे या.मा.काळे यांनाही तसेच वाटते...
पण या परिसरात सिंदीची झाडे नाहीत, तसेच यापूर्वीही नव्हती...
त्यामुळे ह्व म्हणने खरे नाही.....

   अकबराच्या काळात व त्यानंतरी बरीच वर्षे सिंदखेड मेहेकर सरकाराखाली असल्याचे उल्लेख आढळतात. येथील...नीलकंठेश्वर मंदीर, पुतळा, बारव, रामेश्वर मंदीर यासारख्या प्राचीन अवशेषांवरुन सिंदखेड हे बाराव्या शतकापासून अतिशय महत्वाचे स्थळ होते हे दिसून येते या गावी शरभंग ऋषीचा आश्रम होता..
तसेच येथील रामेश्वराचे लिंग प्रभू रामचंद्रांनी लंकेला जात असताना स्थापन केले अशी आख्यायिका आहे... सिंदखेडकर जाधवांच्या घरण्याचे संस्थापक व जिजामातोश्रीचे जन्मदाते लखुजीराजे जाधवराव यांच्या काळात सन १५५७ मध्ये 'राघोजी लखुजी जाधवराव' यांनी येथील नीलकंठेश्वराच्या देवालयाचा जिर्णोध्दार केला होता..
या अर्थाचा एक अकरा ओळींचा शिलालेख या मंदीरावर आहे.....

संदर्भ : स्वराज्य संकल्पिका : राष्ट्रमाता जिजाऊ.

Sunday, 23 July 2017

क्रांतिकारक चंद्र शेखर आझाद

ज्यांनी स्वतः च्या नावातच "आझादी" चा अंश कायम केला होता,,,   असे थोर क्रांतिकारक चंद्र शेखर आझाद.

भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक क्रांतीकारक .  प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ट उदाहरण ...

शहिद भगत सिंह, सुखदेव , राजगुरू यांच्यासारख्या प्रखर देशाभिमानी सशस्त्र क्रांतिकारकांची तुकडी जेव्हा विशेषत: उत्तर भारतात कार्यरत होती, तेव्हाच त्यांना मार्गदर्शन व मदत करण्याचे जोखमीचे कार्य आझाद करत होते.

भारतीय क्रांति क्रांतिकारी आंदोलनातील एक अनुपम व्यक्तिमत्त्व म्हणजे चंद्रशेखर आझाद होत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे अन्योन्य देशप्रेम, दुर्दम्य साहस आणि प्रशंसनीय चारित्र्य देशाच्या स्वातंत्र्य रक्षकांना एक आदर्श आणि शाश्वत प्रेरणा देत आले आहे. एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी ठेवलेला देशभक्तीचा आदर्श कौतुकास्पदच नाही तर स्तुत्यही आहे. आझाद खरोखरच देशभक्ती, त्याग, आत्मबलिदान इ. सदगुणांचे प्रतिक आहेत.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी सध्याच्या
अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते.

हे क्रांतिकार्य करतानाच त्यांना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हौतात्म्य प्राप्त झाले.